RTI Human Rights Activist Association

20th April 2024

RTI Human Rights Activist Association

RTI Human Rights Activist Association

 —  The power To Common Man —

® Regd. Under Niti Ayog & MCA Govt. Of India || ISO 9001 : 2015 Certified

Order of action against the police for delay in filing a complaint

तक्रार नोंदवण्यास दिरंगाई केल्यास पोलिसांवर कारवाईचे आदेश….

तक्रार नोंदवण्यास दिरंगाई केल्यास पोलिसांवर कारवाईचे आदेश – हेमंत नगराळे

Order of action against the police for delay in filing a complaint

आपला काही महत्वाचा ऐवज हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास आपण पोलिसात तक्रार करायला जाता. परंतू काही वेळेस पोलिसांकडून तक्रार नोंदवुन घेताना दिरंगाई केली जाते. पोलिसांकडून कागदपत्र गहाळ झाल्याबाबत नोटरीकडून शपथपत्र (Affidivate) करून आणण्यास सांगितले जाते त्याशिवाय प्रमाणपत्र देण्यास नकार दिला जातो. अशा प्रकारे पोलिस तक्रारदाराची अडवणुक करतात. ही बाब आक्षेपार्ह असल्याचे सांगत मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे नागरीकांना दिलासा दिला आहे.

 

गहाळ झालेल्या वस्तू अगर कागदपत्राबाबत शपथपत्र घेण्याची कोणतीही तरतूद प्रचलित कायद्यामध्ये नाही आहे तरी देखील पोलिसांकडून शपथपत्राची मागणी केली जाते व तक्रारदाराची अडवणूक केली जाते. ही बाब जर पुन्हा निदर्शनास आली तर संबंधित पोलिस अधिकाऱ्यावर खातेनिहाय कारवाई करणार असल्याचे आदेश एका परिपत्रकाद्वारे मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांनी काढले आहेत.

Share :

1 thought on “तक्रार नोंदवण्यास दिरंगाई केल्यास पोलिसांवर कारवाईचे आदेश….”

  1. श्री.सुनिल उमाकांत बेडे

    धन्यवाद साहेब… 🙏 तुम्ही खूप छान माहिती दिली आहे. आम्ही आपले आभारी आहोत… आपल्या सारख्या असंख्य साहेबांची या महाराष्ट्र राज्यातील सामान्य माणसाला गरज आहे…. 🙏🙏🙏🙏

Leave a Reply to श्री.सुनिल उमाकांत बेडे Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!