शेतजमीन एनए कशी करायची ? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रीया व लागणारी कागदपत्रे
महाराष्ट्र जमीन महसूल (कृषी जमिनीचे अकृषी जमिनीत रूपांतर करणे) अधिनियम १९७९ नुसार शेतजमिनीचा वापर इतर कोणत्याही विकासकामासाठी करता येत नाही. त्यासाठी राज्य शासनाची परवानगी घ्यावी लागते.
त्यासाठी आगोदर शेत जमिनीचे अकृषी म्हणजे नॉन ऍग्रिकल्चरल म्हणजे एनए करावे लागते. अनेक शेतकऱ्यांना किंवा सामान्य लोकांना ही प्रक्रिया माहीत नसते. त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात, ते कसे करतात ही माहिती आज आपण जाणून घेऊ.