RTI Human Rights Activist Association

4th December 2023

RTI Human Rights Activist Association

RTI Human Rights Activist Association

 —  The power To Common Man —

® Regd. Under Niti Ayog & MCA Govt. Of India || ISO 9001 : 2015 Certified

ग्रामपंचायत चे सर्व दाखले मोबाईल वर कसे पहायचे Gram Panchayat Mahaegram Citizen Connect App

ग्रामपंचायत चे सर्व दाखले मोबाईल वर कसे पहायचे | Gram Panchayat Mahaegram Citizen Connect App

मस्कार मित्रांनो, नेहमी सारखे आजही आम्ही तुमच्यासाठी एक खूप महत्वाची माहिती घेऊन आलो आहोत. आपल्या आजच्या या नवीन लेख मध्ये आपण जाणून घेणार आहोत कि, ग्रामपंचायत चे सर्व दाखले मोबाईल वर कसे पहायचे या बद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
 
भारतामध्ये प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत हे गावाच्या हितासाठी महत्वाचा केंद्रबिंदू असतो. ग्रामपंचायत हे गावाच्या विकासासाठी महत्वाचे केंद्र असते. आपल्याला ग्रामपंचायती कडून वेगवेगळ्या प्रकारचे दाखले उतारे मिळतात. आता पर्येंत आपल्याला दाखले आणि उतारे काढायचे असेल तर ग्रामपंचायती मध्ये प्रत्येक्ष जावे लागत असयाचे. परंतु ग्रामपंचायतीच्या काही सुविधा ह्या ऑनलाईन झाल्या आहेत. आपल्याला जवळपास ग्रामपंचायतीच्या सर्वच सुविधा ह्या आपल्या मोबाईल वर घरबसल्या मिळतात. त्यामुळे नागरिकांना त्वरित सुविधा मिळतात.

 

ग्रामपंचायतीच्या मिळणाऱ्या सुविधा खालीलप्रमाणे:
आपल्याला आपल्या मोबाईल वरती ग्रामपंचायतीच्या भरपूर सुविधा मिळणार आहेत. कोण-कोणत्या सुविधा मिळणार आहेत त्या पुढे बघूया –
 
मृत्यूचा दाखला, जन्माचा दाखला, विवाह नोंदणी चा दाखला, पाणीपट्टी, घरपट्टी, जागेचा आणि घराचा ७/१२ आणि ८अ उतारा, ग्रामपंचायती मधील पदाधिकार्यानबद्दल माहिती, आपले सरकार सुविधा, व्यवहाराचा इतिहास, इ. सेवा आपल्याला आपल्या मोबाईल वरती खूप सोप्या पद्धतीने मिळतात. कधीही कोठेही ह्या सुविढांचा लाभ नागरिक घेऊ शकतात. त्यासाठी नागरिकांना आपल्या मोबिले वरती एक छोटेसे अँप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल. ते अँप्लिकेशन म्हणजेच Mahaegram Citizen Connect (Early Access). तुम्ही प्ले स्टोर वर फक्त Mahaegram असे टाकले तरीही तुम्हाला हे अँप्लिकेशन मिळून जाईल.

 

 
ग्रामपंचायत चे सर्व दाखले मोबाईल वर कसे बघायचे?
मित्रानो, आता आपण बघणार आहोत कि, ग्रामपंचायत चे सर्व दाखले मोबाईल वर कसे बघणार. तर त्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा –
 
१) सर्वात प्रथम तुम्हाला प्ले स्टोर उघडून Mahaegram असे टाईप करून सर्च करायचे आहे. त्या नंतर तुमच्या समोर पहिले जे अँप येईल ते म्हणजेच Mahaegram Citizen Connect (Early Access) किवा येथे क्लिक करा. हे अँप तुम्ही डाउनलोड या बटनावर क्लिक करून डाउनलोड करून घ्यायचे आहे. तसेच डाउनलोड झाल्या नंतर इंस्टाल सुद्धा करायचे आहे.
 
२) Mahaegram Citizen Connect (Early Access) हे अँप इंस्टाल केल्या नंतर ओपन करायचे आहे. ओपन केल्या नंतर तुम्हाला खाली दर्शविलेल्या फोटो प्रमाणे काही परामिशंस विचारल्या जातील त्यांना तुम्ही allow करायचे आहे.
 
३) आता तुम्हाला इथे तुमचे नवीन अकाउंट तयार करायचे आहे. त्या साठी खाली दिलेल्या Don’t have account? Register या बटनावर क्लिक करायचे आहे.
 
४) त्या बटनावर क्लिक केल्या नंतर पुढे एक पेज ओपन होईल त्या पेज वर तुम्हाला तुमचे प्रथम नाव, मधील नाव, आडनाव टाकायचे आहे. तुम्ही तुमचे नाव टाकल्या नंतर खाली तुम्हाला लिंग विचारलेले आहे, तिथे तुम्ही तुमचे लिंग जे असेल त्या वर क्लिक करायचे आहे. त्या नंतर तुम्हाला जन्मतारीख विचारली आहे, तिथे तुम्ही तुमची जन्मतारीख टाकायची आहे. त्या खाली तुमहाला तुमचा मोबाईल नबर विचारला आहे. तिथे तुम्ही तुमचा मोबाईल नबर टाकायचा आहे आणि आता त्या नंतर तुम्हाला ई-मेल आयडी विचारला आहे तिथे तुम्हाला तुमचा ई-मेल आयडी टाकायचा आहे. हि सर्व माहिती टाकून झाल्या नंतर जतन करा (Submit) या बटनावर क्लिक करा.
 
५) त्या नंतर तुमहाला तुम्ही टाकलेल्या मोबाईल नबर एक ओटीपी येईल, तो ओटीपी तुम्ही  Enter OTP या ठिकाणी टाकायचा आहे. ओटीपी टाकल्या नंतर Confirm या बटनावर क्लिक करायचे आहे.
 
६) हि छोटीशी प्रोसेस झाल्यानंतर Mahaegram या अँप वर तुमचे अकाउंट पूर्णपणे तयार होईल. त्यानंतर तुम्हाला एक मेसेज येईल त्यामध्ये तुम्हाला तुमचा युझरनेम आणि पासवर्ड असेल. तुमचा युझरनेम म्हणजेच तुमचा मोबाईल नबर आणि पासवर्ड हा युनिक़ असेल. तुम्ही आलेला युझरनेम आणि पासवर्ड दिलेल्या जागी टाकून लॉगीन करा.
 
७) पुढे तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे आणि त्यानंतर तालुका हि निवडायचा आहे. तसेच त्यानंतर तुमचे गाव किवा तुमच्या गावाची ग्रामपंचायत जी असेल ते निवडायचे आहे आणि त्यानंतर Submit या बटन वर क्लिक करा.
 
८) त्यानंतर तुमची जी ग्रामपंचायत असेल ती मॅप होईल. तुम्हाला स्क्रीन वर वर आपली ग्रामपंचायत मॅप झाली आहे असा मेसेज येईल. त्यानंतर तुम्ही Ok या बटनावर क्लिक करायचे आहे. तसेच तुम्हाला अँप मध्ये नवीन इंटरफेस दिसेल त्यावर तुम्हाला समजले या बटनावर क्लिक करत जायचे आहे आणि दिलेली सर्व माहिती नीट वाचायची आहे.
 
९) त्यानंतर तुम्हाला त्या अँप मध्ये भरपूर ऑप्शन दिसेल, ज्यात “दाखले/प्रमाणपत्र, व्यवहार इतिहास, आपले सरकार सुविधा, कर भरणा, ग्रा. पं. पदाधिकारी आणि सूचना, इ.” असेल.
Gram-Panchayat-Dakhale-Mobile-Var-Kase-Pahayche (2)
Mahaegram app मधील होम पेज वरील सर्व ऑप्शन बद्दल सविस्तर माहिती
मित्रानो, या अँप मध्ये आपल्याला विविध प्रकारचे ऑप्शन बघायला मिळतात. हे सर्व ऑप्शन आपल्या साठी खूप उपयुक्त आहेत आणि या सर्व ऑप्शन चा आपल्याला खूप फायदा होणार आहे. या सर्व ऑप्शन बद्दल आपण संपूर्ण माहिती पुढे बघूया,
 

१) दाखले/प्रमाणपत्र (Certificate)

दाखले/प्रमाणपत्र या ऑप्शन वर क्लिक केल्या नंतर तुम्हाला पुढीलप्रमाणे पाच दाखले निवडण्यासाठी ऑप्शन मिळेल,
 
१. जन्म नोंदणी दाखला / Birth Certificate
२. मृत्यू नोंदणी दाखला / Death Certificate
३. विवाह नोंदणी दाखला / Marriage Certificate
४. दारिद्र्य रेषेखालील दाखला / Certificate of Below Poverty Line
५. असेसमेंट उतारा / Assessment Transcript
 
या पाच ऑप्शन मध्ये तुम्ही कोणतेही ऑप्शन निवडले तर तुम्हाला तिथे तुमची थोडक्यात आणि उपयुक्त माहिती टाकावी लागेल जी त्या त्या दाखल्या साठी उपयुक्त असेल.
 

२) व्यवहार इतिहास

या अँप मध्ये तुम्हाला तुम्ही केलेली काम याची सविस्तर माहिती मिळेल. तसेच तुम्हाला या ऑप्शनमध्ये ग्रामपंचायतीचा तुम्ही भरलेला वार्षिक कर या बद्दल ची संपूर्ण माहिती दिसेल.
 

३) आपले सरकार सुविधा

आपले सरकार सुविधा केंद्र कडून आपल्याला जे दाखले आणि उतारे काढता येतात त्या सर्वांची माहिती या ऑप्शनमध्ये तुम्हाला मिळेल. तसेच इतरही माहिती जी आपले सरकार सुविधा केंद्राकडून मिळते त्या बद्दलची माहितीही यात मिळते.
 

४) कर भरणा (Tax Payment)

आपल्याला या ऑप्शन मध्ये आपल्याला लागणारा कर बद्दल संपूर्ण माहिती फक्त मोबाईल बघता येईल, त्यामुळे आपल्याला ग्रामपंचायती मध्ये जाण्याची गरज पडणार नाही.
 

५) ग्रा. पं. पदाधिकारी (Grampanchayat Officers)

या ऑप्शन मध्ये तुम्हाला तुमच्या गावामध्ये असलेल्या ग्रामपंचायती मधील काम करत असलेले सर्व पदाधिकारी उदा. सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक आणि कर्मचारी, इ. यांच्या बद्दल माहिती मिळेल.
 

६) सूचना (Notice)

या ऑप्शन मध्ये तुम्हाला ग्रामपंचायती कडून गावासाठी काही सूचना दिल्या गेल्या असतील तर त्या सर्व सूचना समजेल किवा तुम्ही सुद्धा तुमच्या काही सूचना असतील तर त्या ग्रामपंचायतीला याद्वारे देऊ शकता.

 

Gram-Panchayat-Dakhale-Mobile-Var-Kase-Pahayche

निष्कर्ष:

या लेखात  Mahaegram Citizen Connect (Early Access) या अँप बद्दल संपूर्ण माहिती दिली आहे. मला आशा आहे की तुम्हाला  Mahaegram Citizen Connect (Early Access) कसे वापरावे आणि त्याचे फायदे काय आहेत हे समजले असेल. ही ब्लॉग पोस्ट सोशल मीडियावर तुमच्या मित्रांसह शेअर करा. जेणेकरून त्यांनाही  Mahaegram Citizen Connect (Early Access) या अँप बद्दल माहिती मिळेल. 
 

FAQ:

प्रश्न. १: ग्रामपंचायत चे दाखले कोणत्या अँप वर बघता येतात?
उत्तर: Mahaegram Citizen Connect (Early Access)
 
प्रश्न. २: ग्रामपंचायत च्या अँप वर कोण-कोणते दाखले बघता येतात?
उत्तर: ग्रामपंचायत च्या अँप वर खालील प्रकारचे दाखले बघता येतात,
१. जन्म नोंदणी दाखला / Birth Certificate
२. मृत्यू नोंदणी दाखला / Death Certificate
३. विवाह नोंदणी दाखला / Marriage Certificate
४. दारिद्र्य रेषेखालील दाखला / Certificate of Below Poverty Line
५. असेसमेंट उतारा / Assesment Transcript
 
प्रश्न. ३: Mahaegram App वर कोणत्या सुविधा मिळतात?
उत्तर: Mahaegram App वर दाखले/प्रमाणपत्र, व्यवहार इतिहास, आपले सरकार सुविधा, कर भरणा, ग्रा. पं. पदाधिकारी आणि सूचना, इ. सुविधा मिळतात.
 
प्रश्न. ४: Mahaegram App कोठून डाउनलोड करावे?
उत्तर:  Mahaegram App प्ले-स्टोर (Play Store) वरून डाउनलोड करावे किवा येथे क्लिक करा.
Share :

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!