RTI Human Rights Activist Association

25th April 2024

RTI Human Rights Activist Association

RTI Human Rights Activist Association

 —  The power To Common Man —

® Regd. Under Niti Ayog & MCA Govt. Of India || ISO 9001 : 2015 Certified

शिधा पत्रिका धारकांसाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य विमा सेवा

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना 

सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय क्र.रागांयो-२०१६/प्र.क्र.६४/ भाग १/ आरोग्य -६, दिनांक १३ एप्रिल २०१७ अन्वये राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना दि.१ एप्रिल २०१७ पासून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना या नावाने सुरु ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे.

 

या योजनेच तपशील खालीलप्रमाणे:

१.लाभार्थी :- अन्न, नागरी पुरवठा विभागाकडून वितरीत करण्यात आलेल्या पिवळ्या, अंत्योदय, अन्नपूर्णा योजना व केशरी (रु.१ लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न) शिधापत्रिकाधारक कुटुंबे तसेच औरंगाबाद व अमरावती विभागातील  सर्व जिल्हे तसेच नागपूर विभागातील वर्धा या शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबे या योजनेचे लाभार्थी आहेत.

 

२.विमा संरक्षण: या योजनेंतर्गत लाभार्थी कुटुंबाला प्रतिवर्ष रुपये १.५० लाखापर्यंतचे विमा संरक्षण उपलब्ध करून देण्यात येत आहे.मूत्रपिंड प्रत्यारोपण ही मर्यादा प्रतिवर्ष २.५० लाखापर्यंत आहे. लाभार्थी कुटुंबासाठी कोणत्याही एका व्यक्तीला व अनेक व्यक्तीना वरील योजनेचा लाभ घेता येतो.  

 

३.योजनेत समाविष्ट उपचार: योजनेंतर्गत ३० विशेष सेवांतर्गत ९७१ उपचार व शस्त्रक्रिया तसेच १२१ पाठपुरावा सेवांचा समावेश आहे. सदर योजनेत खालीलप्रमाणे विशेष सेवांतर्गत उपचार/ सेवा देण्यात येत आहेत.

 

४.विम्याचा हप्ता- या योजनेच्या लाभार्थी कुटुंबासाठी असणारा विमाच्या हप्ता राज्य आरोग्य हमी सोसायटीमार्फत नॅशनल इन्सुरंस कंपनीस अदा करण्यात येतो.

 

.योजनेमध्ये समाविष्ट रुग्णालये – या योजनेमध्ये ३० पेक्षा अधिक खाटा असणाऱ्या शासकीय/निमशासकीय खाजगी तसेच धर्मादाय संस्थेच्या रूग्णालयांची निवड काही निकषांना अधीन राहून करण्यात आली आहे. लाभार्थी यांच्या मर्जीनुसार राज्यातील कोणत्याही अंगीकृत रुग्णालयात घेऊ शकतो.

 

६.नि:शुल्क (Cashless Medical Services):-  सदर योजनेंतर्गत लाभार्थी रुग्णास अंगीकृत रूग्णालयातून निशुल्क वैद्यकीय सेवा देण्यात पूर्णतः संगणीकृत असून लाभार्थ्यास वैध शिधापत्रिका (पिवळी, अंत्योदय, अन्नपूर्णा व केशरी) व फोटो ओळखपत्राच्या आधारे अंगीकृत रुग्णालयांमधून उपचार अनुज्ञेय आहेत तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिका शेतकऱ्यांना त्यांचेकडील शुभ्र शिधापत्रिका व ७/१२  उतारा आणि फोटो ओळखपत्राच्या आधारे अंगीकृत रुग्णालयांमधून उपचार अनुज्ञेय आहेत. वैद्यकीय सेवांमध्ये रुग्णालयांतील उपचार निदान, आवश्यक औषधोपचार, शुश्रुषा व भोजन तसेच एक वेळेचा परतीचा प्रवास खर्च यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे या योजनेंतर्गत रुग्णालयातून मुक्त केल्यानंतर १० दिवसापर्यंतच्या सेवा पँकेज मध्ये समाविष्ट आहेत.

 

७.आरोग्य मित्र:- अंगीकृत रुग्णालयात लाभार्थी रुग्णाची नोंदणी, उपचारा दरम्यान सहाय्य व मार्गदर्शन करण्यासाठी आरोग्य मित्राची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक अंगीकृत रुग्णालयामध्ये आरोग्य मित्र उपलब्ध आहेत.

 

८.आरोग्य शिबीर:- योजेनेचा लाभ अधिकाधिक रुग्णांनी घेण्याकरिता अंगीकृत रुग्णालयांमार्फत आरोग्य शिबिरे आयोजित करण्यात येतात. या शिबिरांत रुग्णांची तपासणी करून योजनेतील ९७१ उपचारापैकी उपचारांस सदर रुग्ण पात्र ठरल्यास त्यावर योजनेंतर्गत अंगीकृत रुग्णालयामध्ये उपचार केले जातात.

 

९.राज्य आरोग्य हमी सोसायटी व नियामक परिषद:- योजनेच्या दैनंदिन कामकाजाचे सनियंत्रण राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी करतात तसेच यावर नियंत्रक म्हणून मा. मुख्य मंत्री. राज्य यांच्या अध्यक्षतेखाली नियामक परिषद कार्यरत आहे.

 

१०.विमा कंपनी आणि व तृतीय पक्ष प्रशासकीय कंपन्या:- योजनेची राज्यात अमलबजावणी करण्यासाठी नॅशनल इन्सुरंस कंपनी या सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपन्याची (TPAs) निवड केलेली असून त्यांचा मार्फत अंगीकृत रुग्णालयांची निवड, उपचारांच्या पूर्व परवानगीची तपासणी करणे, दाव्यांची तपासणी करणे, आरोग्य मित्राची तसेच राज्य व जिल्हा स्तरीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे ह्या महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडण्यात येतात.

 

११. मदतीसाठी संपर्क :-

  • टोल फ्री क्रमांक:-  १५५३८८/ १८००२३२२००
  • रुग्णालय- आरोग्य मित्र
  • पोस्ट बॉक्स – पो.बॉक्स क्र. १६५६५, वरळी पोस्ट ऑफिस  वरळी मुंबई – ४००००१८
  • संकेतस्थळ- www.jeevandayee.gov.in

 

Share :

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!