महाराष्ट्र जमीन महसूल (कृषी जमिनीचे अकृषी जमिनीत रूपांतर करणे) अधिनियम १९७९ नुसार शेतजमिनीचा वापर इतर कोणत्याही विकासकामासाठी करता येत नाही. त्यासाठी राज्य शासनाची परवानगी घ्यावी लागते.
त्यासाठी आगोदर शेत जमिनीचे अकृषी म्हणजे नॉन ऍग्रिकल्चरल म्हणजे एनए करावे लागते. अनेक शेतकऱ्यांना किंवा सामान्य लोकांना ही प्रक्रिया माहीत नसते. त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात, ते कसे करतात ही माहिती आज आपण जाणून घेऊ.
एनए करण्यासाठी खालीलप्रमाणे कागदपत्रे लागतात..
१) जमिनीचा ७/१२ उताऱ्याचा ४ झेरॉक्स.
२) जमिनीचा फेरफार उतारा.
३) जर तुमच्या जमिनीचे महसूल विभागाकडे कोणतेही रेकॉर्ड उपलब्ध नसेल तर महसूल अधिकारी यांच्याकडून जमिनीचे कोणतेही कागदपत्रे उपलब्ध नसल्याचे प्रमाणपत्र काढून घ्या.
४) जमिनीचा ८ अ चा उतारा.
५) जिल्हाधिकारी कार्यालयात मिळणारा फॉर्म भरून त्यावर कोर्टाची ५ रुपयांचा स्टॅम्प.
६) तालुका जमीन रेकॉर्ड कार्यालयाने दिलेला जमिनीचा नकाशा.
७) जर इमारतीसाठी एनए करायचे असेल तर बिल्डिंग प्लॅनच्या ८ प्रती.
८) जर जमीन कोनट्याही प्रकल्पाच्या आड येत नाही याची खातरजमा करण्यासाठी चालू ७/१२ उतारा.
९) जर तुमची जमीन राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग, जलदगती महामार्ग यामध्ये येत असेल तर राज्य महामार्ग प्राधिकरण, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जलदगती महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र काढून घ्या.
१०) जर तुम्ही ग्रामीण भागात असाल तर ग्राम पंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्र, जर शहरी भागात असाल तर महापालिका किंवा शहरी स्वराज्य संस्थेचे प्रमाणपत्र.
११) जर जमीन बॉंम्बे वहिवाट आणि शेती कायदा १९४८ अंतर्गत असेल तर एनएसाठी परवानगी ४३/६३ नुसार मिळेल.
१२) जमिनीवर गाव पातळीवरील शेतकरी सहकारी विकास सोसायटीकडून कोणतेही कर्ज किंवा भरणा नाही हे प्रमाणपत्र आवश्यक.
१३) जी जमीन एनए करायची आहे ती कोणत्याही कामासाठी किंवा प्रकल्पसाठी घ्यायची किंवा अधिग्रहित करायची नाही असे सांगणारे तलाठयाचे पत्र.
एनएसाठी अर्ज कसा करावा.
१) जिल्हाधिकारी कार्यलयात अर्ज करावा.
२) अर्ज मिळाल्यावर जिल्हाधिकारी ७ दिवसात ताहिलदाराना अर्ज पाठवतात.
३) तहसीलदार अर्जाची छाननी करतात.
४) तहसीलदार तोच व्यक्ती जमिनीचा मालक आहे की नाही हे पाहतात, तलाठयांकडून जमिनीची चौकशी करून घेतात.
५) तहसीलदार हे जमीन एनए झाल्यानंतर कोणत्या पर्यावरणीय अडचणी किंवा कोणत्या प्रकल्पाला धोका असणार नाही ना हे पाहतात.
६) ही सगळी तपासणी पूर्ण झाल्यानंतर जिल्हधिकारी जमीन रूपांतरांची ऑर्डर किंवा आदेश काढतात.
७) त्यानंतर तलाठी कार्यालयात जमिनीची एनए अशी नोंद होती.