RTI Human Rights Activist Association

29th May 2023

RTI Human Rights Activist Association

RTI Human Rights Activist Association

 —  The power To Common Man —

® Regd. Under Niti Ayog & MCA Govt. Of India || ISO 9001 : 2015 Certified

If there is no road for agriculture, apply in this manner in writing to the Tehsildar; Get the right road

शेतीसाठी नसेल रस्ता तर अशा पद्धतीने करा तहसीलदारांना लेखी स्वरूपात अर्ज; मिळेल हक्काचा रस्ता

शेती करताना शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. शेताची सगळ्यात मोठी समस्या असेल तर शेतात जायला लागणारा रस्ता. बऱ्याचदा शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता नसतो.हक्काचा रस्ता आपला कसा होणार या विचारात शेतकरी असतात. शेता साठी रस्ता असणे हे फार गरजेचे आहे. या लेखात आपण शेतासाठी कायदेशीररित्या रस्ता नेमका कसा मिळवायचा? त्यासाठी काय करावे लागते याची माहिती घेऊ.

रस्त्यासाठी असा करा अर्ज

 कायदेशीर रस्ता तयार करण्यासाठी शेतकऱ्याला तहसिलदाराकडे लेखी स्वरूपात अर्ज करावा लागेल. शेतकऱ्याला हा रस्ता शेजारच्या शेतकऱ्याच्या बांधावरून दिला जातो. तहसीलदार यांच्या नावाने अर्ज करावा लागणार आहे. त्यानंतर कशाच्या आधारे तुम्ही हा अर्ज करता आहे ते नमूद करायचे आहे. त्याखालोखाल अर्जाचा विषय लिहायचा आहे. विषयांमध्ये शेतात येण्या-जाण्यासाठी जमिनीच्या बांधावरून कायमस्वरूपी मिळण्याबाबत, असा विषय नमूद करावा. यानंतर अर्जदाराचे नाव आणि शेती ची माहिती द्यावी लागेल.

 अर्जदाराची लागणारी माहिती

 अर्जदाराचे नाव, गाव, तालुक्याचे नाव आणि जिल्ह्याचे नाव असायला पाहिजे. त्याखाली अर्जदाराला आपल्या शेतीचा तपशील द्यायचा आहे. गट क्रमांक, शेतकऱ्याकडे असलेली शेती किती आहे तसेच अर्जदाराची शेती जर सामायिक क्षेत्रात येत असेल तर त्याच्या वाटणीला किती शेती येत आहे. यानंतर अर्जदार शेतकऱ्याच्या शेतजमिनी शेजारी कोणा कोणाची शेती आहे. त्या शेतकऱ्यांची नावे आणि पत्ता याची माहिती द्यावी लागते. यामध्ये अर्जदाराच्या जमिनीच्या चारही दिशांना ज्या शेतकऱ्यांची जमीन आहे त्यांची नावे आणि पत्ते द्यावे लागणार आहे.

अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे

  • अर्जदाराचा आणि शेजारील शेतकऱ्याच्या जमिनीच्या बांधावरून रस्त्याची मागणी केली आहे त्या जमिनीचा कच्चा नकाशा
  • अर्जदाराचा जमिनीचा सातबारा उतारा
  • शेजारील शेतकऱ्यांची नावे, पत्ते आणि त्यांच्या जमिनीचा तपशील
  • अर्जदाराच्या जमिनीचा न्यायालयात काही वाद सुरू असेल तारखेचे कागदपत्रांसह माहिती.

 रस्त्याची गरज आहे का? केली जाते पाहणी

 शेजारच्या शेतकरी यांना नोटीस पाठवून त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्याची संधी दिली जाते. तसेच अर्जदाराला शेतरस्त्यांची खरोखरच गरज आहे का? याचीही तहसीलदारांकडून प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करून खातरजमा केली जाते. एकदा का ही प्रक्रिया पूर्ण झाली की तहसीलदार शेतरस्ता मागणीच्याअर्जावर निर्णय घेतात .

 

 

 तहसीलदार यांच्या आदेशानंतर रस्ता दिला जातो

 तहसीलदारांनी अर्जदार शेतकऱ्याचा अर्ज मान्य केला तर, शेजारील शेतकऱ्याच्या बांधावरून अर्जदार शेतकऱ्याला रस्ता देण्यासाठी चा आदेश काढतात. यामध्ये शेजारच्या शेतकऱ्याच्या शेतजमिनीचे कमीत कमी नुकसान होईल, याची काळजी घेतली जाते.आठ फूट  रुंदीचा रस्ता मंजूर केला जातो.

Share :

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!