नो पार्किंगमध्ये उभी असलेली वाहने टोचन करण्यापूर्वी नागरिकांना कोणकोणत्या प्रकारच्या सूचना दिल्या जातात याबाबत असललेल्या कार्यालयीन आदेशाची प्रत माहिती अधिकारातून मागणी केल्यानंतर पुरवण्यात आलेली पीडिफ फाईल खाली दिलेल्या लिंकवर अपलोड केलेली आहे. मित्रांनो डाउनलोड करा, वाचा, इतरांना वाचण्यासाठी पाठवा.
गाड्या उचलण्यासाठी देण्यात येणारा ठेका आणि शासन यामध्ये झालेल्या करारामध्ये कोणकोणत्या अटी आणि शर्ती असतात, कराराची प्रत खाली दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करून वाचावी ही विनंती आहे.
गाड्या उचलण्यासाठी देण्यात येणारा ठेका आणि शासन यामध्ये झालेल्या करारामध्ये कोणकोणत्या अटी आणि शर्ती असतात, कराराची प्रत खाली दिलेल्या लिंकवरून डाउनलोड करून वाचावी ही विनंती आहे.
मित्रांनो “वरील सगळ्या प्रश्नांचा कागदोपत्री जाब विचारण्याची जबाबदारी आणि कर्तव्ये”, तुमचे, आमचे सर्वसामान्य माणसाचे आहे. कोणीच जाब विचारत नाही, म्हणून दिवसाढवळ्या संपूर्ण शहरात नाहक आणि विनाकारण दिवसभर अशाप्रकारे गाड्या उचलून हप्ते वसूल करणे हे एकप्रकारे छळवणूक व नागरिकांची पिळवणूक आहे.
माहिती गोळा करा, पत्रव्यवहार करा, पाठपुरावा करा, आपल्या शहराचे अनेक फेसबुक, वॉट्सअप ग्रुप आहेत त्यावर पोस्ट करून द्या, लोकांना माहिती होऊद्या, जागे होऊद्या.
शहरातील 50 हजार रुपये महिना कमावणारा प्रत्येक माणूस महिन्याला साधारणपणे, इन्कम टॅक्स, मालमत्ता कर, पाणीबिल, वीजबिल असे मिळून जवळपास 2 ते 3 हजार रुपये सरकारला छुपे कर रूपाने देतो. पण हे पैसे कशाप्रकारे, कुठे, कोण खर्च करतोय, त्याबद्दल्यात आपल्याला काय मोबदला मिळतोय याचा थांगपत्ता नसतो..! व आयुष्यभर कधीही विचरण्याचा प्रयत्नही करत नाही! तुम्हीच सांगा देश अधोगतीकडे जाईल की प्रगतीकडे जाईल, भ्रष्टाचार कमी होईल की, वाढेल?
- 09 डिसेंबर 2017 चे ठाणे वाहतूक पोलीस उपयुक्तांचे आदेश.
● 28 डिसेंबर 2017 चे ठाणे वाहतूक पोलीस उपयुक्तांचे आदेश.
● 27 डिसेंबर 2017 चे ठाणे पोलीस आयुक्तांचे आदेश.