आपल्या सर्वांना माहीत आहे की, जेव्हापासून राज्यांत रेशन कार्डला आधार क्रमांक लिंक करण्यात आले तेव्हापासून रेशन कार्डला एक विशिष्ट क्रमांक देण्यात येत आहे. ज्याला “RC नंबर” म्हणजे रेशन कार्ड नंबर असे म्हणतात. तर हा रेशन कार्ड नंबर तुम्हाला माहीत नसेल, तर तो नेमका कसा शोधायचा? आणि तुमच्या मोबाईलवर हा नंबर कसा शोधून काढावा? यासाठी आपण पुढे माहिती घेणार आहोत.
दरम्यान, तुमचा रेशन कार्ड नंबर जाणून घेण्याकरिता तुम्हाला सर्वप्रथम अँड्रॉइड मोबाईलवर एक app इंस्टॉल करावे लागेल, आणि तर सर्व स्टेप बाय स्टेप माहिती पाहुयात.
1. सर्वप्रथम तुमच्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोर ओपन करून घ्यावे.
2. गुगल प्ले Store औपन झाल्यावर सर्वात वर सर्व बार मध्ये “मेरा रेशन” हे केंद्र शासनाकडून जारी करण्यात आलेले मोबाईल अप्लिकेशन सर्च करावे.
3. मेरा रेशन अप्लिकेशन इंस्टॉल करून ते ओपन करून घ्यावे,
4. “मेरा रेशन” हे अप्लिकेशन ओपन झाल्यावर काही परमिशन तुम्हाला ऑल्लो कराव्या लागतील. त्यानंतर अप्लिकेशनच्या होमपेजवर तुम्हाला बरेच ऑप्शन दिसतील.
5. दिसत असलेल्या ऑप्शनमधून 7 व्या क्रमांकावरील ” आधार सिडिंग ” ह्या ऑप्शनवर क्लिक करावे.
6. “आधार सिडिंग” या ऑप्शनवर क्लिक केल्यावर आता तुम्हाला “रेशन कार्ड नंबर” आणि
7. तर यामधून तुम्ही ” अँड्रॉइड मोबाईल” हा ऑप्शन सिलेक्ट करून तुमच्या घरातील कोणत्याही सदस्याचे आधार क्रमांक त्या ठिकाणी नमूद करून घ्यावे. आणि सबमीट बटणावर क्लिक करावे. 8. सबमीट बटणावर क्लिक केल्यावर आता तुमच्या रेशन कार्डची संपूर्ण माहिती तुम्हाला दिसेल.
9. ज्यामध्ये Home State म्हणजे तुमचे राज्य, Home District म्हणजे तुमचा जिल्हा, Scheme म्हणजे तुम्हाला कोणत्या योजने अंतर्गत रेशन मिळत आहे, त्यानंतर Card Number दिसेल. आणि खाली रेशन कार्डवर सर्व सदस्यांची नावे आणि त्याचे आधार क्रमांक सिडिंग आहे की नाही, ही माहिती दिसेल.
10. तर यामध्ये तुम्हाला दिसत असलेला Card Number जो की 12 अंकी असेल, तोच तुमचा रेशन कार्ड क्रमांक असणार आहे. याचबरोबर, तुम्ही RC क्रमांक तपासण्यासाठी तुम्ही राज्याच्या ऑफिशियल वेबसाईट भेट देऊ शकता. तसेच ऑफिशियल वेबसाईट मोबाईलवरही उघडता येईल. अधिकृत वेबसाइटवर NREGA विभागातील रेशन कार्ड तपशीलांवर क्लिक करा. जिल्हा तहसील ग्रामपंचायत गाव रास्त भाव डीलरचे नाव शोधा. सर्व शिधापत्रिकाधारकांची नावे दिसून येतील. यासोबतच तुम्ही शिधापत्रिका क्रमांकही पाहू शकता.
रेशन कार्ड ऑनलाईन कसं पाहायचं?
आता एकदा का तुम्हाला तुमचा आरसी नंबर मिळाला की तुम्ही तुमचं रेशन कार्डही ऑनलाईन पाहू शकता.
त्यासाठी तुम्हाला rcms.mahafood.gov.in असं सर्च करायचं आहे.
त्यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. या पेजवरील उजवीकडील Ration Card या पर्यायाखालील Know your ration card यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.
त्यानंतर तुम्हाला कॅप्चा टाकून Verify या बटनावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर रेशन कार्ड नंबर टाकायचा आहे. आता आपण ऑनलाईन जो रेशन कार्ड नंबर पाहिला तो तुम्हाला इथं टाकायचा आहे. तो टाकला की समोरील view report वर क्लिक करायचं आहे.
त्यानंतर तुमच्यासमोर तुमच्या रेशन कार्डसंबंधित माहिती ओपन होईल.
स्क्रीनवर तुम्हाला दिसेल की, सुरुवातीला रेशन कार्ड नंबर आणि मग त्यापुढे Print Your Ration Card असा पर्याय दिलेला आहे.
यावर क्लिक केलं की तुमचं रेशन कार्ड तुमच्यासमोर ओपन होईल. यावर रेशन कार्ड नंबर, कुटुंब प्रमुखाचं नाव आणि पत्ता, रेशन दुकानदाराचा नंबर-नाव-पत्ता, कुटुंबातील सदस्यांची माहिती, तसंच तुम्हाला कोणत्या योजनेअंतर्गत धान्य मिळतं आणि ते किती मिळायला हवं, याची माहिती दिलेली असते.
आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे हे रेशन कार्ड तुम्ही कोणत्याही सरकारी किंवा इतर कामासाठी वापरू शकत नाही. तशी स्पष्ट सूचनाच इथं दिलेली आहे. ही सुविधा तुम्हाला तुमचं रेशन कार्ड ऑनलाईन बघता यावं, केवळ यासाठीच उपलब्ध करून देण्यात आली आहे.