RTI Human Rights Activist Association

3rd March 2024

RTI Human Rights Activist Association

RTI Human Rights Activist Association

 —  The power To Common Man —

® Regd. Under Niti Ayog & MCA Govt. Of India || ISO 9001 : 2015 Certified

Criminal laws, rules and provisions of the Code under the RTI Act….

माहिती अधिकार कायद्याच्या चौकटीतील फौजदारी कायदे, नियम व संहितेतील तरतुदी….

माहिती अधिकार कायद्याच्या चौकटीत राहून सहाय्यक माहिती अधिकारी, जन माहिती अधिकारी व प्रथम अपिलीय अधिकारी यांनी उपलब्ध माहिती पुरवली नाही तर, खालील फौजदारी कायदे, नियम व संहितेतील तरतुदींचा भंग होतो, म्हणून प्रत्त्येक अर्जाच्या मागे वरील मजकूर कायम झेरॉक्स करुन द्यावा.


१) माहिती अधिकारात माहिती न देणे:- मा.अ.अ. २००५ कलम २० चा भंग रुपये २५ हजार दंड


२) अर्ज, निवेदन, संचिता, धारिका यावर वेळेत कार्यवाही न करणे: विलंब अधिनियम २००५ कलम १० (१).१०(२) नुसार शिस्त भंगाची कार्यवाही.


३) नागरिकांची सनद प्रसिध्द न करणे:-सरकारी नोंकराने मालकांना म्हणजे जनतेचा विश्वासघात करणे भारतीय दंड संहिता कलम ४०७ ते ४०९.


४) कोणत्याही व्यक्तीला क्षति पोहोचवण्याच्या उद्येशाने लोकसेवकाने कायदयाची अवज्ञा करणे :- भारतीय दंड संहिता कलम १६६अ-१वर्षे शिक्षा


५) लोकसेवकाने कायदयाने दिलेल्या निर्देशाची अवज्ञा केरणे: भारतीय दंड संहिता कलम १६६अ = २वर्षे शिक्षा व द्रव्यदंड अथवा दोन्ही शिक्षा. क्षति पोहोचवण्याच्या उद्येशाने लोकसेवकाने चुकीच्या दस्ताऐवजांची मांडणी सतत करणे :- भारतीय दंड संहिता कलम १६७ = ३ वर्षे


६) सक्षम करावयास अथवा द्रव्यदंड अथवा दोन्ही शिक्षा.


७) लोकसेवकाने कोटी माहिती पुरविणे : भारतीय दंड संहिता कलम १७७ ६ महिने शिक्षा अथवा द्रव्यदंड या दोन्ही शिक्षा.


८) शासन आदेशांचे पालन न करणे :- भारतीय दंड संहिता कलम १८८= ६ महिने कैद अथवा रु.१०००/- द्रव्यदंड वा दोन्ही शिक्षा.


९) खोटया दस्ताऐवजांची मांडणी करुन पुरावे तयार करणे :- भारतीय दंड संहिता कलम १९३= ७ वर्षे सक्तमजुरीची व दंडाची अश्या दोन्ही शिक्षा.


१०) खोटे कथन करणे = भारतीय दंड संहिता कलम १९९-७ वर्षे सक्तमजुरीची व दंडाची वा दोन्ही शिक्षा.


११) लोकसेवकाने चुकीच्या दस्ताऐवजांची मांडणी करणे (एखादया व्यक्तीला शिक्षेपासून वाचविण्याचा उद्येशाने) :- भारतीय दंड संहिता कलम २१७ = २ वर्षे सक्तमजूरीची शिक्षा व दंड वा दोन्ही शिक्षा.


१२) कायदयाच्या निर्देशनाची अवमानना करणे : भारतीय दंडा संहिता कलम २१८=३वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा वा द्रव्यदंड अथवा दोन्ही शिक्षा.


१३) न्यायिक कार्यवाहीत लोकसेवकाने भ्रष्टतापूर्वक बेकायदेशीर अहवाल देणे :- भारतीय दंड संहिता कलम २१९-७ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा वा द्रव्यदंड अथवा दोन्ही शिक्षा.


१४) लोकसेवकाचे फौजदारीपात्र गैरवर्तनः लाप्रअ कलम १३(१) अ,ब,क,ड.ई. १३ (२) सुधारणासह १५८५वर्षे सक्तमजुरीची शिक्षा, द्रव्यदंड वा दोन्ही.


१५) सार्वजनिक अभिलेख कायदा १९९३ व महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख कायदा २००५ कलम ४,८व ९ : ५ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व द्रव्यदंड वा दोन्ही शिक्षा.


१६) तक्रारदारांना सनमानाची वागणुक देणे:- शासन निर्णय गृह विभाग दिनांक १७/०६/२०१६ च्या तरतुदी.


१७) सार्वजनिक मालमत्ता क्षति म्हणजे नष्ट करणे वा जाळून नष्ट करणे :- सार्वजनिक मालमत्ता क्षति प्रतिबंध कायदा १९४८ कलम ३ व ४ = अनुक्रमे ५ व १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व दंड वा दोन्ही.


१८) शासनाच्या ध्येयधोरणाविरुध्द कामे करणे :- बेकायदेशीर कृत्ये प्रतिबंध कायदा १९६७ कलम ३,१०, ११, १६, १६अ, ३८,३९ व ४० = जन्मठेपेची शिक्षा व द्रव्यदंड अथवा दोन्ही शिक्षा.


१९) शासकीय अभिलेख्यांचे बनावट हिशोब तयार करुन ते खरे म्हणून सतत सादर करणे :- भारतीय दंड संहिता कलम ४७७ अ= १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा व दंड वा दोन्ही.


२०) शासकीय अभिलेख गहाळ करण्याचा विचार करणे :- भारतीय दंड संहिता कलम ५११ = कलमांची शिक्षा ही मुळ कलमांच्या शिक्षेऐवढी


२१) शासकीय नोकराने जनेतेचा विश्वासघात करणे: भारतीय दंड संहिता कलम ४०९=७ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा वा द्रव्यदंड अथवा दोन्ही शिक्षा.


२२) सतत चोरीच्या वस्तु खरेदी करुन शासकीय अभिलेख्यात नोंद करणे :- भारतीय दंड संहिता कलम ४११= १० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा वा द्रव्यदंड अथवा दोन्ही शिक्षा.


२३) सतत चोरीच्या वस्तु खरेदी करुन शासकीय अभिलेख्यात नोंद करणे :- भारतीय दंड संहिता कलम ४१३= १४ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा वा द्रव्यदंड अथवा दोन्ही शिक्षा.


२४) अधिकार नसतांना अधिकार असल्याचे भासवुन जाणीवपुर्वक बनावट दस्ताद्वारे तोतयेगिरी करणे : भारतीय दंड संहिता कलम ४६४ ते ४६७ १०वर्षे सक्तमजुरीची शिक्षा वा द्रव्यदंड अथवा दोन्ही शिक्षा (AIR 1927ALAHABAD 45)


२५) एकाच प्रकारचे फोजदारी गैरकृत्य वारंवार करणे:-मुंबई सराईत गुन्हेगारी प्रतिबंध कायदा १९५१ कलम ३ व १२ मुळ कायदयाच्या तुरतुदीच्या दुप्पर शिक्षा व द्रव्यदंड अथवा दोन्ही शिक्षा.


२६) कार्यालयातील अभिलेख संघटिपणे सतत गहाळ करणे : महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायदा २००२/२०१२ कलम ३ व इतर लागु सर्व फौजदारी कायदे नियम व संहितेतील तरतुदीन्वये.

Share :

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!