RTI Human Rights Activist Association

3rd March 2024

RTI Human Rights Activist Association

RTI Human Rights Activist Association

 —  The power To Common Man —

® Regd. Under Niti Ayog & MCA Govt. Of India || ISO 9001 : 2015 Certified

आरोपी आणि दोषी व्यक्तींनाही आपल्या संविधानाने दिले आहेत महत्वपूर्ण अधिकार जाणून घ्या

सातबारा हा शेतकऱ्यांसाठी त्यांच्या मालकी हक्काचा एक भक्कम पुरावा असतो. या सातबाराच्या आधारे शेती संबंधित अनेक गोष्टी त्यांना करता येतात. परंतु अतिशय महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या सातबारा मध्ये आजकाल अनेक चुका दिसून येतात. कधी नावामध्ये चुका तर हक्कांमध्ये एखादी गोष्ट चुकीने नोंद झालेली असते.

 

परत या सगळ्या गोष्टी नीट करायला शेतकऱ्यांना अनेक समस्या येतात. या चुका दुरुस्त करण्यासाठी त्या विषयाची माहिती सुद्धा असणे शेतकऱ्यांना तेवढेच महत्त्वाचे आहे की, यात नक्की काय चूक झाली आहे आणि आपल्याला कशाप्रकारे यात बदल केला पाहिजे. आज आपल्या या लेखातून आपण सातबारा झालेल्या चुका कशा दुरुस्त करायचा हे सविस्तरपणे पाहणार आहोत. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचायला विसरू नका.

 

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 155 अशी चूक किंवा लेखन प्रमाणात दुरुस्त करण्यासाठी तहसीलदार यांच्याकडे अर्ज करता येतो. म्हणजेच जर आपल्या सातबारा अशा प्रकारची काही चूक झाली तर, आपल्याला तलाठ्याकडे अर्ज करून कोणत्याही प्रकारचा फायदा होत नाही. यासाठी आपल्याला तहसीलदाराकडे जावे लागते.

 

आणि रीतसर अर्ज करावा लागतो. हा अर्ज केल्यानंतर तहसीलदार तलाठ्याला या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सांगतात. अशा चुका दुरुस्त करण्यासाठी काहीही तसं संबंधी यांना नोटीस पाठवणे आवश्यक असते. अशा काही चुका किंवा लेखन प्रमाणात झाल्याचे संबंधित पक्षकारांनी कबूल केले पाहिजे.

 

जर आपण आपल्या सातबारा वरील एखाद्या व्यक्तीचे नाव कमी करण्यासाठी अर्ज केला. चुकून त्या व्यक्तीचे नाव आपल्या हक्कांमध्ये आला किंवा सातबारा त्यांचे नाव आहे. अशावेळी तहसीलदार त्या व्यक्तीला स्वतः नोटीस पाठवतात. त्या व्यक्तीने जर नाव कमी करण्यासाठी कुठलीही तक्रार नसेल आणि आपली ही विनंती मान्य असेल तर ते नाव सातबारा वरून कमी करता येते किंवा नाव दुरुस्ती करता येते. अशा प्रकारच्या सातबारावरच्या कोणकोणत्या प्रकारच्या चुका दुरुस्त करता येतात याविषयीची काही उदाहरणे आपण या ठिकाणी पाहणार आहोत.

1) सातबारा लिहिताना एखादा चेहरा किंवा एखाद्या खातेदाराचे नाव लिहिण्याची राहून गेले असेल तर अशा प्रकारची चूक या कायद्याअंतर्गत दुरुस्त करता येते. म्हणजेच पाठीमागे जे दहा वर्षानंतर सातबाराचे पुनर्लेखन होत होते त्यामध्ये जर एखाद्या खातेदाराचे नाव चुकीने राहिला असेल तर तो पुन्हा लिहिता येतो.अशा प्रकारची चूक कलम 155 अंतर्गत दुरुस्त करता येते.

2) एखाद्या सातबारा सदरी असलेली काही नावे कमी करण्याचा आदेश आला होता. परंतु त्या देशांनुसार नावे कमी करण्यात आली नाहीत. म्हणजेच आपण एखाद्या अभिलेखातील नाव कमी करणे, याविषयी तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज केला होता. किंवा तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांनी अशा प्रकारचे आदेश सुद्धा केले होते. परंतु या आदेशाची अंमलबजावणी झाली नसेल तर अशा प्रकारच्या अंमलबजावणी आपणास अशा १५५ कलमानुसार करता येते.

3) एखाद्या जमिनीची कुळ कायदा कलम 32 ग नुसार ठरलेली रक्कम मूळ मालकाला दिल्यानंतर मूळ मालकाचे नाव सातबाराच्या इतर हक्कात राहिले असेल. म्हणजेच कुळ कायद्याविषयीचे हे कलम आहे l. या अंतर्गत कलम 32 नुसार आपण मूळ मालकाला रक्कम दिली आणि नंतर ही मूळ मालकाचे नाव सातबाराच्या इतर हक्कात असेल तर असे नाव आपणास कमी करता येते.

4) नोंदणीकृत दस्त यातील मजकुरात असणारा एखादा उल्लेख फेरफार सद्री नोंदवण्यात आला नसेल, म्हणजेच ज्या वेळेस आपण जमिनीचे खरेदी व्यवहार करतो, त्यावेळेस नोंदणीकृतदस्त असतो रजिस्ट्री कॉपी असते. त्यातील महत्त्वाचा मजकूर जसे वारसाचे नाव किंवा जमिनीचे क्षेत्रफळ यामध्ये काही चूक झालेली असेल किंवा असा उल्लेख सातबारावर झाले नसेल तर आपल्याला कलम १५५ अंतर्गत अशाप्रकारचे सुद्धा दुरुस्ती करता येते.

5) फेरफार सदरी नोंदविलेले एखाद्या वारसाचे नाव सातबारा सदरी नोंदविण्यात आलेले नाही म्हणजेच एखादया वरसाचे नाव जर सातबाऱ्यावर आलेले नसेल तर ते सुद्धा या कायद्यानुसार आपल्याला आणता येते. यावरून असे ध्यानात येते की, कुठेतरी मूळ दस्तावेज आदेशात केलेला उल्लेख किंवा आदेश नोंदविण्यात चूक झाली असेल तरच सर्व हितसंबंधाचे म्हणणे विचारात घेऊन अशी चूक किंवा लेखन प्रमाण दुरुस्त करता येतो.

म्हणजेच यामध्ये मूळ अभिलेखामध्ये पूर्वीचे जे रेकॉर्ड त्यामध्ये जर तुमचे नाव व्यवस्थित असेल आणि तुम्ही जी चूक दुरुस्त करण्यासाठी अर्ज केलेला आहे. ती चूक झालेली असेल मूळच्या अभिलेखात ती असेल तर तुम्हाला अशा प्रकारचा अर्ज करून त्या ठिकाणी सातबारावर चूक दुरुस्त करता येते, आणि अशाप्रकारे ज्यांचे नाव कमी होणार आहे. अशी ज्यांच्या ज्यांच्याशी संबंधित ती चूक आहे. त्या सर्व हितसंबंधीताना अगोदर नोटीस दिल्या जाते आणि त्यांची जर कुठलीही तक्रार नसेल तरच अशा प्रकरणावर कार्यवाही होऊ शकते.

Share :

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!